अंधारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा थाटात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अंधारी ता. सिल्लोड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात व थाटात पार पडला.

या वेळी रस्ते, पाणीपुरवठा, सभामंडप, अंतर्गत गटारे आदी विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात अंधारी गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले. 

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पा. तायडे, सेवानिवृत्त विभागीय निबंधक देविदास पालोदकर, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे यांच्यासह सरपंच नलुताई तायडे, उपसरपंच डॉ. मनोहर गोरे, अब्दुल रहीम, नारायण जाधव, जयवंता गोरे, लक्ष्मण तायडे, युवासेनेचे धैर्यशील तायडे, हौसीराम गोरे, अनिल गोरे, आरेफ कुरेशी, रत्नाकर बडक आदिंसह स्थानिक पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.